ग्रामपंचायत विभाग

विभागाचे नाव –                     पंचायत समिती, देवळा

खाते प्रमुखाचे पदनाम –          सहाय्यक गटविकास अधिकारी / विस्तार अधिकारी (ग्रा.प.)

विभागाचा दूरध्वनी क्रमांक

विभागाचा ईमेल

ग्रामपंचायतींचा आढावा

या गटात एकूण 133 ग्रामपंचायती असून त्यापैकी ग्रुप ग्रामपंचायती 52, स्वतंत्र ग्रामपंचायती 80 आणि 1 ग्रामदान मंडळ आहे.

– एकूण ग्रामपंचायत सदस्य: 1239

– स्त्री सदस्य:434
– पुरुष सदस्य: 805
– एकूण ग्रामपंचायत सरपंच: 133
– स्त्री सरपंच: 83
– पुरुष सरपंच: 50

ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेअंतर्गत विशेष अनुदान

योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत खालील सुविधा पुरविल्या जातील:

1. दहन/दफनभूमी व्यवस्थापन
– दहन/दफनभूमी भू-संपादन
– चबुतरा बांधकाम, पोहोच रस्ता
– आवश्यकतेनुसार कुंपण व भिंती
– विद्युतीकरण, विद्युत दाहिनी
– पाणीपुरवठा, स्मशान घाट सुधारणा

2. ग्रामपंचायत भवन/कार्यालय बांधकाम
– नवीन इमारत बांधकाम
– जुन्या इमारतींची पुनर्बांधणी किंवा विस्तार
– इमारतीभोवती कुंपण, परिसर सुधारणा

योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता
1. प्रत्येक कामास ग्रामसभेची सहमती आवश्यक
2. तांत्रिक मान्यता सक्षम अधिकाऱ्यांकडून घ्यावी
3. अंदाजपत्रक, नकाशे, आराखडे तयार करणे
4. देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्र व ठराव
5. जिल्हा नियोजन समितीमार्फत कामांची निवड
6. बांधकामाच्या जागेचा 7/12 उतारा अथवा नमुना 8 उतारा
7. जागेच्या मालकीसंदर्भात आवश्यक दाखले
8. स्थळदर्शक नकाशा
9. प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावा

मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान

योजनेचे स्वरूप
– बाजारपेठ विकास
– सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था
– बाग-बगीचे, उद्याननिर्मिती
– अभ्यास केंद्रे
– गावातील अंतर्गत रस्ते सुधारणा
– सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत नाले

योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता
1. ग्रामसभेची प्रशासकीय मान्यता आवश्यक
2. तांत्रिक मान्यता सक्षम अधिकाऱ्यांकडून घ्यावी
3. अंदाजपत्रक, नकाशे, आराखडे तयार करणे
4. जिल्हा नियोजन मंडळाच्या निकषानुसार प्राधान्यक्रम
5. 7/12 उतारा अथवा नमुना 8 उतारा
6. इतर योजनांमध्ये मंजूर नसल्याचे प्रमाणपत्र
7. स्थळदर्शक नकाशा
8. प्रस्ताव पंचायत समिती, देवळा येथे सादर करावा

ग्रामिण भागातील रस्ते व मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत विकास

योजनेचे स्वरूप
– गावांतर्गत रस्ते आणि गटारे
– पावसाच्या पाण्याचा निचरा
– स्मशानभूमी आणि दफनभूमी सुधारणा
– संरक्षक भिंती
– ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम
– आठवडी बाजार सुधारणा
– सार्वजनिक स्वच्छतेसाठी कचरा डेपो

योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता
1. तांत्रिक मान्यता आवश्यक
2. अंदाजपत्रक, आराखडे, नकाशे
3. ग्रामपंचायत हमीपत्र व ठराव
4. बांधकामाच्या जागेचा 7/12 उतारा अथवा नमुना 8 उतारा
5. अन्य योजनांत मंजूर नसल्याचे प्रमाणपत्र
6. लोकप्रतिनिधींची शिफारस पत्र
7. स्थळदर्शक नकाशा
8. गटविकास अधिकारी यांचे शिफारसीसह प्रस्ताव पंचायत समिती, देवळा येथे सादर करावा

स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)

स्वच्छ भारत मिशन म्हणजे काय?
स्वच्छतेबाबत जनजागृती व ग्रामस्तरावर स्वच्छतेची सवय निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत गावांमध्ये शौचालये बांधणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे आणि कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

योजनेच्या प्रमुख बाबी
1. माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम
2. ग्रामीण स्वच्छता साधनसामुग्री दुकान स्थापन
3. कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालये
4. सार्वजनिक स्वच्छतागृहे
5. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
6. शालेय स्वच्छता आणि आरोग्य शिक्षण

योजनेची प्रमुख उद्दिष्टे
1. ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणे
2. गावांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे
3. ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणे
4. शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता सुविधा उपलब्ध करणे

महत्वाच्या लिंक
  • युआयडीएआय – माझा आधार
  • महाराष्ट्र शासन
  • देवळा पंचायत समिती
  • ई-ऑफिस प्रणाली
  • माहितीचा अधिकार कायदा
  • सार्वजनिक तक्रार
  • कायदे/नियम/अधिसूचना (महाराष्ट्र शासन )
  • ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक
हेल्पलाइन नंबर
  • पोलिस हेल्पलाइन : १०० 
  • रुग्णवाहिका : १०८ 
  • भ्रष्टाचार विरोधी : १०६४ 
  • जिल्हा नियंत्रण कक्ष : १०७७ 
  • आपत्ति व्यवस्थापन : १०७८ 
  • गुन्हा थांबवणारे : १०९० 
  • दामिनी पथक हेल्पलाइन : १०९१
  • चाइल्ड हेल्पलाइन : १०९८ 
  • नागरिक कॉल सेंटर : १५५३००